Saturday, September 13, 2025
घरआरोग्यविषयकगणेश विसर्जनानंतर निर्मल महाविद्यालय कांदिवली यांचे समुद्रकिनारा स्वच्छता सफाई अभियान.

गणेश विसर्जनानंतर निर्मल महाविद्यालय कांदिवली यांचे समुद्रकिनारा स्वच्छता सफाई अभियान.

प्रतिनिधी – गणेश विसर्जनानंतर समुद्रकिनाऱ्यावर होणाऱ्या कचऱ्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होते. ही बाब लक्षात घेऊन निर्मल उच्च महाविद्यालयातील १५० विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक बनून आक्सा चौपाटी स्वच्छ ठेवण्याची मोहिम राबवली. या उपक्रमामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी श्री. ओमकार सावंत आणि प्राध्यापक श्री. सोनु राणा यांनी देखील प्रदूषण कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी निर्माल्य , प्लास्टिकच्या वस्तू, थर्माकोल आणि इतर गोष्टी गोळा करून ते पालिकेच्या गाडीत सुपूर्त केल्या, यावेळी महानगर पालिकेचे अधिकारी श्री. परमार आणि श्री. किरण सुतार हे उपस्थित होते. स्वच्छता अभियान कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाग झाल्याचे प्राचार्य यशवंत कदम उपप्राचार्य किरण गजर तसेच संस्थेचे सचिव डॉ. चित्रसेन अभ्यंकर यांचे प्रोत्साहन पर मोलाचे मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments