Tuesday, September 9, 2025
घरमहाराष्ट्रमुंबई मराठी साहित्य संघाच्या निवडणुकीत ‘मत चोरी’चा गंभीर प्रकार

मुंबई मराठी साहित्य संघाच्या निवडणुकीत ‘मत चोरी’चा गंभीर प्रकार

मुंबई : मुंबई मराठी साहित्य संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतपत्रिका गहाळ झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. अनेक मतदारांना त्यांच्या पत्त्यावर मतपत्रिका मिळाली नसल्याची तक्रार असून काही मतपत्रिका परत आल्याचेही स्पष्ट झाले आहे. सोमेश कोलगे या सदस्याच्या पत्त्यावर मतपत्रिका मिळाली नाही, तरीही संघाच्या नोंदीत ती इंडिया पोस्टमार्फत पाठविल्याची नोंद असून कन्साइनमेंट क्रमांक ‘EM804399024IN’ नमूद आहे. मात्र इंडिया पोस्टच्या संकेतस्थळावर ‘Article Not Booked’ असा स्टेटस रिपोर्ट दिसून येत असून मतपत्रिका प्रत्यक्षात पाठवली गेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

निवडणुकीची अधिसूचना प्रमुख कार्यवाह डॉ. अश्विनी भालेराव यांच्या सहीने जाहीर झाली असली तरी निवडणूक अधिकारी ऍड. यशोधन दिवेकर यांनी योग्य पडताळणी न करता ती स्वीकारल्याचा आरोप करण्यात आला आहे. मतदार याद्या अद्ययावत न करता मृत व चुकीच्या पत्त्यांवर मतपत्रिका पाठवल्या गेल्या. त्यात ऊर्जा पॅनलच्या जाहीरनाम्याला मात्र योग्य वितरण झाले असून मतपत्रिकांबाबत मात्र अनियमितता दिसून आली आहे.या पार्श्वभूमीवर मतपत्रिका लपवून योग्य वेळेला पेटीत टाकण्याचा कट रचल्याचा आरोप उपस्थित करण्यात आला असून निवडणूक पारदर्शी नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. त्यामुळे निवडणूक नव्याने घेऊन कंत्राटदार व निवडणूक अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषदेत माहिती देताना साहित्य संघाचे सभासद व डॉ.भालेराव विचार मंच चे उमेदवार दिवाकर दळवी,अभिनेते प्रमोद पवार अन्य सदस्य उपस्थितीत होते.
RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments