प्रतिनिधी : मुंबई शहरामध्ये मराठी माणूस आपलं अस्तित्व टिकवत असताना उद्योग व्यवसायामध्ये मराठी माणसाने पुढे यावे या उद्देशाने महाराष्ट्र बाजारपेठ ची स्थापना सात वर्षांपूर्वी १ मे २०१७ रोजी झाली. या बाजारपेठेचे संस्थापक अध्यक्ष कौतिक दांडगे यांनी सर्वसामान्य नागरिकांना गोरगरिबांना अगदी कमी दरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्या या उद्देशाने या बाजारपेठेची स्थापना केली होती. आज रोजी या बाजारपेठे मध्ये ५० हजार महिला जोडल्या गेल्या आहेत.
महाराष्ट्र बाजार पेठेच्या या वर्धापन दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेत्री वर्षा उसगावकर,आयुषमान भारत मिशनचे प्रमुख ओमप्रकाश शेट्ये,डॉ कौतिक दांडगे,सी इ ओ सौ अनुजा कौतिक दांडगे उपस्थित होत्या. सदर सोहळा शिवाजी मंदिर नाट्यगृह,दादर येथे संपन्न झाला.
पुरस्काराचे मानकरी मालवणी सम्राट दिगंबर नाईक, अभिनेते नागेश भोसले ,लावणी क्वीन मेघा घाडगे,अभिनेत्री रजनी पंडित, कश्मिरा कुलकर्णी, गौरी नलावडे, जुई गडकरी,तन्वी कोलते,लावणी कलावंत महासंघाच्या अध्यक्षा कविता घडशी,अमित भानुषाली, मयुरा रानडे,समाजसेवक,निर्माते किरण कुडाळकर, बोर्ड मेडल विनर सागर कर्तुळे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रत्येकाला सन्मानचिन्ह,मानाची पैठणी,सोन्याची नथ ही महिला पुरस्कार विजेत्यांना देण्यात आली.
या सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्र बाजारपेठेच्या सीईओ सौ.अनुजा कौतिक दांडगे यांनी केले होते. या सोहळ्याचे सूत्रसंचालन संतोष लिंबोरे पाटील यांनी केले.