मुंबई : शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या आशिर्वादाने तसेच शिवसेना सचिव व शिव चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार यांच्या संकल्पनेतून शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी व उपनेत्या शीतल म्हात्रे यांच्या संयोजनाखाली मुंबई शहर व उपनगरातील २० विधानसभा क्षेत्रातील सुमारे …. संघांनी सहभाग घेतला. शिवसेनेच्या वतीने आयोजित “लाडक्या बहिणींची महामंगळागौर नृत्य स्पर्धा” नुकतीच मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडली व त्या स्पर्धेतील प्राथमिक फेरीत निवडून आलेल्या २० नृत्यसंघांची महाअंतिम फेरी काल बांद्रयातील रंगशारदा सभागृहात पार पडली. सदर महाअंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून नृत्यकलाक्षेत्रातील निष्णात असलेले देवेंद्र शेलार, अश्विनी शेलार पायल पांडे व हर्षदा चव्हाण हे परीक्षक म्हणून लाभले. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापति मा. डॉ. नीलम गो-हे, खासदार मिलिंद देवरा, आमदार प्रकाश सुर्वे मा. खासदार संजय निरुपम शिवसेना उपनेत्या सुवर्णा करंजे, तृष्णा विश्वास राव, कला शिंदे, संजना घाडी, राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन सी, प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे, ॲड. सुशीबेन शहा, शिवसेना प्रसार माध्यम समन्वयक दिनेश शिंदे व चित्रपटक्षेत्रातील सुकन्या कुलकर्णी मोने, शर्मिष्ठा राऊत, मानसी साळवी व इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी सौ. साक्षी शेलार व सुशांत शेलार निर्मित “आमचा
एकनाथ भाऊ” या गाण्याचे प्रकाशन ज्येष्ठ नेत्या मीनाताई कांबळी व खा. मिलिंद देवरा यांच्या शुभहस्ते झाले.
लाडक्या बहिणींच्या या महामंगळगौर अंतिम महाफेरीत पारंपरिक मराठी संस्कृतीचे सौंदर्य आणि महिला सक्षमीकरणाचे दर्शन घडवणारी ही प्रथमच झालेली स्पर्धा यंदा विशेष लक्षवेधी ठरली.
मुंबई शहरातील विविध भागांतून आलेल्या सांस्कृतिक मंडळांनी पारंपरिक पोशाख, फुगड्या, झिम्मा आणि इतर गावरान लोक कलाकृती सादर करत रसिकांची मने जिंकली. रंगतदार नृत्याविष्कार, तालबद्ध फुगड्या आणि लोभस सादरीकरण यामुळे सभागृहातील प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
अंतिम फेरीचा निकाल पुढीलप्रमाणे जाहीर झाला:
🏆 प्रथम क्रमांक: पारितोषिक ₹ १,११,१११/-
कलादर्पण (मागठाणे) – उत्तम वेशभूषा लयबद्ध ताल, सांघिक एकता आणि वाखाणण्याजोगा अभिनय सादरीकरण यामुळे त्यांनी पहिला क्रमांक पटकावला.
🥈 द्वितीय क्रमांक: पारितोषिक ₹ ७७,७७७/- शिवकन्या (भायखळा) – पारंपरिकतेचा बाज जपत, नव्या शैलीने त्यांनी नृत्य सादर केले.
🥉 तृतीय क्रमांक: पारितोषिक ₹ ५५,५५५/-
चंद्रकोर (चेंबूर) – सुरेख साजशृंगार व सर्जनशीलतेचा मिलाफ पाहायला मिळाला.
🎖️ उत्तेजनार्थ पुरस्कार: पारितोषिक ₹ २२,२२२/-
• नवरंग (बोरिवली)
• हिरकणी (मागठाणे)
या स्पर्धेच्या निमित्ताने मुंबईतील मराठी भगिनींचे कलेप्रती असलेलं प्रेम आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा ध्यास पुन्हा एकदा दिसून आला. आयोजकांकडून सर्व सहभागी मंडळांचे अभिनंदन करण्यात आले असून, पुढील वर्षी ही स्पर्धा अधिक भव्य स्वरूपात पार पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
शिवसेनेचं हे सांस्कृतिक पाऊल म्हणजे आधुनिकतेच्या युगातही आपली पारंपरिक मूल्यं आणि लोककला जिवंत ठेवण्याचा सुंदर प्रयत्न आहे.