सातारा(विजय जाधव) : आधुनिक काळात पत्रकारिता अधिक सक्षमपणे करण्यासाठी प्रत्येक पत्रकाराला सायबर सिक्युरिटी बाबत माहिती पाहिजे. एआय तंत्रज्ञानाचाही वापर करुन सहज आकर्षक बातमी तयार करण्यासाठी पत्रकारांसाठी शनिवार दि.३० ऑगस्ट रोजी दुपारी १ ते ३ यावेळेत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. तज्ञांकडून थेट संगणकावर बसून हे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती सातारा जिल्हा पत्रकार संघ, सातारा पत्रकार संघ, सातारा तालुका पत्रकार संघाच्यावतीने देण्यात आली आहे.
रयत शिक्षण संस्थेचे वर्ये येथील पंचायत राज प्रशिक्षण केंद्र, केबीपी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, सातारा जिल्हा पत्रकार संघ, सातारा पत्रकार संघ, सातारा तालुका पत्रकार संघाच्या वतीने शनिवार दि.३० ऑगस्ट २०२५ रोजी दु.१ ते ३ या वेळेत केबीपी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या संगणक लॅबमध्ये पत्रकारांशी संबंधित “सायबर सिक्युरिटी आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर” प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळामध्ये सायबर सिक्युरिटी बाबत माहिती दिली जाणार असून त्याच बरोबर पत्रकारांशी संबंधित एआय तंत्रज्ञानाची टूल्स शिकविली जाणार आहेत. पत्रकारांसाठी एआय तंत्रज्ञानाची माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे आकर्षक, सहज, अधिक प्रभावी बातम्या करता येतील.
कार्यशाळेसाठी मर्यादित प्रवेश असून त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणीसाठी (9850030115,
आणि 9975293377 ) या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन सातारा जिल्हा पत्रकार संघ, सातारा पत्रकार संघ व सातारा तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.