ताज्या बातम्या

ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्राची दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला भेट

पुणे : ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्र, पुणे यांच्या टीमने आज दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, एरंडवना, पुणे येथे भेट देऊन माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 4(1)(ख) संदर्भात पाहणी केली.

या वेळी प्रशिक्षणार्थी म्हणून श्री. अमित कांबळे, श्रीमती श्रद्धा राठी, कु. प्राणीता राठी, सौ. पूजा गांधी, श्री. संतोष बागमार, श्री. संतोष शिंदे व श्री. राहुल शिवरकर उपस्थित होते.

पाहणी दरम्यान प्रशिक्षण केंद्राने रुग्णालय प्रशासनाकडे नागरिकांच्या सार्वजनिक हितासाठी माहिती पारदर्शक पद्धतीने खुली करण्याची मागणी केली. त्यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाने माहिती २० वर्षांनंतर नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे.

हा निर्णय माहिती अधिकार अधिनियमाच्या उद्देशाशी सुसंगत असून, पारदर्शकता आणि जबाबदारीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. त्यामुळे भावी काळात नागरिकांना संस्थेच्या कारभाराविषयी अधिक स्पष्टता आणि विश्वास प्राप्त होणार आहे.

ही मान्यता व कार्यवाही हे ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्राच्या महत्त्वपूर्ण यशाचे प्रतीक ठरले आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top