Monday, August 18, 2025
घरमहाराष्ट्रकोल्हापूर'समृद्ध जीवन'ची मालमत्ता विकून गुंतवणूकदारांना पैसे परत द्यावेत ; पुणे सत्र न्यायालयाचा...

‘समृद्ध जीवन’ची मालमत्ता विकून गुंतवणूकदारांना पैसे परत द्यावेत ; पुणे सत्र न्यायालयाचा आदेश

प्रतिनिधी : पुणे येथील समृद्ध जीवन फूड्स इंडिया लि या कंपनीने फसवणूक केलेल्या गुंतवणूकदारांचे पैसे कंपनीची जप्त मालमत्ता विकून परत करण्याचे आदेश पुणे सत्र न्यायालयाचे न्या श्री वाघमारे यांनी दिले आहेत. गुंतवणूकदारांची संघटना प्रोग्रेसिव्ह वेलफेअर असोसिएशनतर्फे ॲड. प्रवीण टेंभेकर यांनी केलेल्या इंटर्व्हेन्शन अर्जावर निकाल देताना माननीय न्यायालयाने सक्षम प्राधिकारी यांना मालमत्तेचा लिलाव करून अर्ज करणाऱ्या 2 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांचे पैसे वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे 2013 पासून बुडालेल्या गुणवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती प्रोग्रेसिव्ह वेलफेअर असोसिएशन (पुणे)च्या सचिव आरती दातार यांनी दिली असून अधिक माहितीसाठी ॲड्. प्रवीण टेंभेकर (9322314102) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.*

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments