तळमावले/वार्ताहर : जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांना संदीप डाकवेंकडून लाईव्ह अक्षरगणेशा रेखाटून भेट दिला आला. त्यांच्या अक्षरगणेशा कौशल्याचे वर्षा पाटोळे यांनी कौतुक केले. याप्रसंगी त्यांच्यासमवेत राहुल पवार, सत्यम पाचुपते व इतर मान्यवर उपस्थित होते. यासोबतच संदीप डाकवे यांनी आपल्या वडिलांवर लिहलेल्या ‘तात्या’ या पुस्तकाची एक प्रतही पाटोळे यांना दिली.
दरम्यान, संदीप डाकवे यांच्या कलेची व सामाजिक क्षेत्रातील कार्याची वर्षा पाटोळे यांनी माहिती घेतली. ‘‘खूप सुंदर…छान…! आपणांस खूप खूप शुभेच्छा’’ अशा शब्दात जिल्हा माहिती अधिकारी यांनी डाकवे यांचे कौतुक केले. यापूर्वीचे सातारा जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनाही संदीप डाकवे यांनी स्केच दिले होते.
विशेष म्हणजे गणेशोत्सवाचे औचित्य साधून अक्षरगणेशाकार संदीप डाकवे यांनी “एक अक्षरगणेशा संमेलनासाठी” उपक्रम राबवला आहे. यामध्ये फक्त रु.99 मध्ये अक्षरगणेशा रेखाटून घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.
संदीप डाकवे हे गेली सुमारे 20 वर्षापासून अक्षरगणेशा उपक्रम राबवत आहेत. त्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त रुपयाची रोख मदत केली आहे.
संदीप डाकवे यांच्या विविध कलात्मक उपक्रमांची नोंद इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड आणि वर्ल्ड ग्रेटेस्ट बुक ऑफ रेकाॅर्ड मध्ये तीनदा, हायरेंज बुक ऑफ रेकाॅर्ड, आणि द ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकाॅर्ड या पुस्तकांनी घेतली आहे.
जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांना संदीप डाकवेंकडून अक्षरगणेशा भेट
RELATED ARTICLES