कल्याण(अजित जगताप) : ठाणे जिल्हा,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे जिल्ह्याच्या वतीने पुणे पोलिसांनी केलेल्या मागासवर्गीय मुलींचे अत्याचाराबाबत ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे..सचिन शेजाळ,तहसीलदार, कल्याण यांना निवेदन देण्यात आले.
पुण्यामध्ये संभाजीनगर येथून कौटुंबिक कारणाने पोलीस दलातील अधिकाऱ्याने त्रास दिला. त्यामुळे मदतीसाठी सदर विवाहित महिला पुणे येथे ओळखीच्या मुलींकडे आली होती. त्यावेळी पुणे पोलिसांनी मागासवर्गीय मुलींची मानहानी केली.
या घटनेला आठवडा उलटले,तरीही पोलिसांनी संबंधित पोलीस व कर्मचाऱ्यांवर एफ आय आर दाखल केला नाही.याबाबत सजग नागरिक म्हणून या मुलींच्या मैत्रिणी व सामाजिक कार्यकर्ते पुण्यामध्ये आंदोलन करीत आहेत. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रभर पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत.
तरी या पिडीत मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी, राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून तात्काळ हस्तक्षेप करावा आणि संबंधित पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागणीसाठी ठाणे या ठिकाणी अँड तृप्ती पाटील,राज्य कायदा विभाग कार्यवाह,डॉ सुषमा बसवंत,कार्याध्यक्ष,ठाणे जिल्हा, ॲड आरती हटकर,जिल्हा कायदा विभाग कार्यवाह प्रज्ञा चव्हाण,जिल्हा महिला विभाग कार्यवाह, आंबेडकरी चळवळीतील योद्धा गौतम जाधव,हनुमंत देडगे हे महाअंनिसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान ,महाराष्ट्रभर महिलांच्या सुरक्षिततेबाबत काळजी घेणाऱ्या काही पक्षातील महिला याबाबत मूक गिळून गप्प आहेत. त्यांच्या लाचारीबद्लही चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे. त्या महिला पक्षाच्या कामकाजासाठी वेठबिगारी म्हणून काम करत आहेत. त्यांना व्यक्ती स्वातंत्र नसल्यामुळे त्यांना मत व्यक्त करता येत नाही. हे समजू शकतो. अशी भावना ठाणे जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
______________________________
फोटो– ठाणे तहसीलदार यांना निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते गौतम जाधव व मान्यवर (छाया– अजित जगताप कल्याण)