Friday, September 19, 2025
घरमहाराष्ट्रराष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, चेंबूर युथ कौन्सिल व पंचरत्न मित्र मंडळ...

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, चेंबूर युथ कौन्सिल व पंचरत्न मित्र मंडळ तर्फे रक्तदान शिबिर व कारगिल युद्धातील सैनिकांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन

मुंबई (शांताराम गुडेकर) : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, चेंबूर युथ कौन्सिल व पंचरत्न मित्र मंडळ तर्फे रक्तदान शिबिर व कारगिल युद्धातील सैनिकांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन बुधवार दि.६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता गंगाधर देशमुख हॉल,आरसीएफ कॉलनी, चेंबूर येथे करण्यात आले आहे.कारगिल विजयाचा स्मृतिदिन साजरा करण्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम होणार आहे.कारगिल युद्धात सहभाग घेतलेल्या शूर सैनिकांचा सत्कार सोहळा यानिमित्ताने आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात मा.ब्रिगेडियर (नि.) सुधीर सावंत- माजी खासदार व अध्यक्ष, सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य,सुभेदार सुभाष दरेकर- उपाध्यक्ष, सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य,श्री. समाधान निकम-अध्यक्ष, उद्योग विभाग, सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य,श्री. डी. एफ. निंबाळकर- जनरल सेक्रेटरी, सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य,श्री.शत्रुघ्न महामुनकर-सचिव, सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य,श्री.सरदार चोपडे-सचिव, सैनिक प्रदूषण, महाराष्ट्र राज्य,श्री. फ्लेचर पटेल- जिल्हाध्यक्ष, सैनिक फेडरेशन मुंबई,श्री. राजू पाटील-जिल्हाध्यक्ष, सैनिक फेडरेशन ठाणे,श्री. सुरेश काकडे-जिल्हाध्यक्ष, सैनिक फेडरेशन नवी मुंबई,कॅप्टन सुभाष चव्हाण- उपाध्यक्ष, सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य,सुभेदार आनंद पवार- संघटक, कोकण विभाग,श्री.सोपान जाधव-संघटक, ग्रेटर मुंबई,श्री.संजय शिंदे-संघटक, मुंबई,श्री.श्रीधर टकेकर- संघटक, मुंबई,श्री.अनिल सुंडक-तालुकाध्यक्ष, भिवंडी,कॅप्टन शंकर कदम-संघटक, ठाणे,श्री. प्रमोद शिंदे- संघटक, ठाणेयांचा सत्कार होणार आहे.आपल्या उपस्थितीने हा कार्यक्रम अधिक गौरवशाली होईल.तरी आपण सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे,असे आवाहन श्री.डी.एफ.निंबाळकर( जनरल सेक्रेटरी सैनिक फेडरेशन, महाराष्ट्र राज्य)आणि आयोजक यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments