म
ुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना अपंग सहाय्य सेनेच्या वतीने एक सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. दादर पूर्व येथील कमला मेहता (मुलीची) अंधशाळा येथे शाळेतील सर्व मुलींना शालेय गणवेश व साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचे आयोजन शिवसेना अपंग सहाय्य सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाला दादर-माहीम विधानसभेचे आमदार महेश सावंत, उपविभाग प्रमुख यशवंत विचले,मुख्याध्यापिका तन्वी माधळकर मॅडम,सरचिटणीस सुभाष कदम, भारतीय कामगार सेनेचे चिटणीस निशिकांत शिंदे, शाखाप्रमुख अभिषेक सावंत यांच्यासह सुधीर वाडेकर,प्रमोद जानकर, मोहन लट्टम, मंगेश मालवणकर,शशांक घाडीगावकर
आदी. मान्यवर उपस्थित होते.
शिवसेना संस्थापक वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने कार्यरत असलेल्या या सेनेमार्फत दरवर्षी अंध व अपंग बांधवांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येते. यंदाही उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम समाजाप्रती असलेल्या संवेदनशीलतेचे प्रतिक ठरला.