ताज्या बातम्या

कलारंग प्रस्तुत श्री रत्नेश्वर कृपेने सुभाष बांबरकर( धामणसे) आयोजित शक्तीतुरा -जंगी सामन्याचे आयोजन

मुंबई (शांताराम गुडेकर) : कलारंग प्रस्तुत श्री रत्नेश्वर कृपेने सुभाष बांबरकर धामणसे आयोजित शक्तीतुरा जंगी सामना मुंबई येथे होणार आहे. यामध्ये शक्तीवाली शाहीर स्नेहा स. खोत (अखंड सदालाल घरण्यातील गुरुवर्य शाहीर महादेव कावळे यांची शिष्या)कोरस विनिता खोत, माई पायकोळी, विनया म्हात्रे शाखा- आई गावदेवी नृत्य कला पथक (सकलप म्हसळा)तर तुरेवाली शाहीर सुप्रिया तरळ(ताडदेव घराण्यातील परमपूज्य कै.तुकाराम शिंदे, बबन शांताराम बारकु, रघुनाथ गुरुवर्य व कवी एकनाथ माळी यांची शिष्या,सहकवी रमाकांत जावळे शाखा – साई श्रद्धा महिला कलापथक, मुंबई (कानसे ग्रुप) यांच्या मध्ये सामना होणार आहे. हा सामना मंगळवार दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी रात्रौ ०८:३० वा. छत्रपती श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह दादर येथे आयोजित केला आहे.तिकिटासाठी -सुभाष बांबरकर : ९८९२३८४४७१ अमोल भातडे : ९०८२३९७८०६ संदेश पालकर : ८६५२३ ९२८०८ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top