सातारा(अजित जगताप) : सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रशासकीय कारभार आहे. मोठ्या प्रमाणात न्याय मागणीसाठी आंदोलन होते . तरी ही प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते महेश शिवदास यांच्यावर आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे. आजच्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे. सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यकारी, बांधकाम कार्यकारी अभियंता व कर्मचाऱ्यांनी शासकीय कामे अपूर्ण असतानाही आलेल्या निधीतून टक्केवारी घेऊन बिल काढले आहेत. हे निवेदनाद्वारे सिद्ध करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सध्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडले आहेत. लोकांचे जीवनमान त्रस्त झाले आहेत. दुसऱ्या बाजूला लोकांनी विकत घेतलेल्या प्लॉट व फ्लॅटचा दर्जा घसरूनही कारवाई होत नाही. प्रांताधिकारी ,नगर रचनाकार यांनी परवानगी दिलेल्या अनेक प्रकल्पांबाबत दिवाणी न्यायालयात गरजवंतांना हेलपाटे मारावी लागत आहे. मग शासकीय कार्यालय नेमके कशासाठी? असा प्रश्न उपस्थित केला आहे. इमारतीचे बांधकाम पूर्ण नसतानाही ते विकण्याची घाई केल्यामुळे अनेकांना आता पश्चाताप होत आहे.
सातारा वन विभाग आणि सामाजिक वनीकरण, कास कार्यकारी समिती, वन व्यवस्थापन समिती हे फक्त पर्यटकांच्या पैशावर चरण्यासाठी पांढरा हत्ती ठरलेले आहे. पर्यटनकांना कोणती सुविधा इथे मिळत नाही. लाल मातीचे गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांना पाठीशी घातले जाते. असाही आरोप उपोषणकर्ते महेश शिवदास यांनी केला आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी स्वतःचे बलिदान दिले आहे. त्या सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी शासकीय कार्यालय व ग्रामपंचायत मध्ये अंधश्रद्धा पाळली जात आहे. श्रद्धा ही हिंदूंचे अधिकार आहेत. ते व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे. परंतु शासकीय कार्यालयात त्याचे प्रदर्शन मांडले जात आहे. याला विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सातारा जिल्ह्यातील आरोग्य विभागातही मनमानी कारभार सुरू असून औषधाचा तुटवडा असल्याचे सांगितले जाते. खाजगी मेडिकल दुकानातून गरीब, कष्टकरी, शेतमजूर रुग्णांना औषधे घेण्याचा घाट घातला जात असल्याने त्यांनी आरोप केला. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांचे उपोषणाला वाढता पाठिंबा मिळत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अमोल पाटोळे, महेश भिसे, निळकंठ लोखंडे, बादल मोहिते, रमेश गायकवाड, सलीम बागवान, शहाजी गुजर आदींनी त्यांच्या रास्त मागणीला पाठिंबा दिला आहे.
____________________________
फोटो — साताऱ्यात प्रशासकीय दहशतवादाविरोधात सामाजिक कार्यकर्ते महेश शिवदास यांचे उपोषण सुरू (छाया– अजित जगताप, सातारा)