ताज्या बातम्या

प्रसिद्ध गायक नंदेश उमप ईशान्य मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात

प्रतिनिधी : प्रसिद्ध शाहीर विठ्ठल उमप यांचे पुत्र गायक नंदेश उमप यांनी बहुजन समाजवादी पक्षाच्या वतीने ईशान्य मुंबईमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ईशान्य मुंबईतून महायुतीने मिहिर कोटेचा यांना, तर महाविकास आघाडीने संजय पाटील यांना उमेदवारी दिली आहे. उमप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे आता या मतदारसंघात तिंरगी लढत असेल. उमप म्हणाले की, समाजकार्यासाठी आपण lदेखील काहीतरी केले पाहिजे. आता आपण वेगळी इनिंग खेळली पाहिजे, याच हेतूने मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. याआधीच्या सरकारमध्ये मी सांस्कृतिक खात्यात काम करत होतो. कलाकारांसाठी काही करता येईल का? कलाकारांचेही अनेक प्रश्न आहेत. कलाकारांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top