ताज्या बातम्या

राज्यात ओपिनियन आणि एक्झिट पोलला निवडणूक कालावधीत प्रतिबंध


मुंबई, : भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा निवडणूक 2024 साठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल) दर्शविण्यावर प्रतिबंध केला आहे.
महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणुका होत असून, याअनुषंगाने 16 मार्च 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यात 19 एप्रिल रोजी सकाळी सात वाजेपासून 1 जून 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंतच्या कालावधीत एक्झिट पोल साठी प्रतिबंध लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक टप्प्यातील मतदान संपण्याच्या आधी 48 तासाच्या कालावधीत ओपिनियन पोल अथवा अन्य मतदान सर्वेक्षणाच्या परिणामांच्या प्रकाशन अथवा प्रसारणावर प्रतिबंध असेल, असे निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे.

0000

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top