प्रतिनिधी : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र नायक’ या कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते आज राजभवन मुंबई येथे संपन्न झाले.
कार्यक्रमाला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री गिरीश महाजन, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, वरिष्ठ आमदार कालिदास कोळंबकर, आमदार योगेश सागर यांच्यासह राज्य विधानमंडळाचे सदस्य व निमंत्रित उपस्थित होते.