मुंबई (शांताराम गुडेकर) : नालासोपारा विरार रहिवाशी पंचक्रोशी मंडळ दाभोळच्या वतीने रविवारी दिनांक २० जुलै रोजी नालासोपारा पूर्व दुबे हॉल येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला.सुरुवातीला मंडळाचे अध्यक्ष श्री.संतोष अडखळे व सचिव श्री.अतुल वाडकर खजिनदार रवींद्र पेंढारी, उप अध्यक्ष श्री विनोद टक्के, उप सचिव दिलीप चिविलर उप खजिनदार श्री प्रभाकर वाडकर व मंगेश गोरीवले, सुभाष जाधव व अन्य सर्व कार्यकारी मंडळींच्या वतीने कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.प्रमुख मान्यवर म्हणून श्री.नवनाथजी शिंदे श्री.दीपक मांडवकर (पत्रकार),दाभोळ करजाई भैरी प्रतिष्ठान सचिव श्री. सुरेश नारकर, महाड तालुका कुणबी समाज संघटना प्रमुख श्री.संजय गोलांबडे, श्री.राजेश पिचुडले, श्री.विनोद पार्टी, श्री.सचिन मांडवकर, श्री.उदयजी जाधव व अन्य मंडळी उपस्थित होती.कार्यकारी कमिटीच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात झाली तर श्री.सुरेश नारकर यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच मान्यवरांचा सत्कार करून मुख्य कार्यक्रम म्हणजे विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न करताना तालुक्यातील उच्च शिक्षीत मुले व दहावी बारावी यश प्राप्त केलेल्या मुलांचा सन्मान केला. व त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.याप्रसंगी तालुक्यातील नागरिक, पालक आणि विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला व सर्वानी कौतुक केले.शिक्षण हेच भवितव्य घडवते, आणि त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना लागणाऱ्या आवश्यक मार्गदर्शक ही काळाची गरज आहे, असे मत अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये कार्यकारिणी सदस्यांनी मोलाचे योगदान दिले. नियोजन,सन्मान संकलन, वितरण व्यवस्था, नोंदणी प्रक्रिया या सर्व गोष्टी काटेकोरपणे राबवण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.कार्यक्रमाच्या सर्व मान्यवरांचे, पालकांचे आणि स्वयंसेवकांचे आभार मानण्यात आले.भविष्यात अशा उपक्रमांची संख्यात्मक व भौगोलिक वाढ करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.हा उपक्रम म्हणजे समाजसेवा, शैक्षणिक मदत आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम ठरला असून, सर्व मान्यवरांच्या वतीने कार्यकारी मंडळाचे आभार मानले.
नालासोपारा विरार रहिवासी पंचक्रोशी मंडळ दाभोळतर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
RELATED ARTICLES