प्रतिनिधी : पालघर जिल्ह्यातील तारापूर मेडिकल अँड वेलफेअर ट्रस्ट आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सर्वद फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. सुचिता पाटील (पीएचडी) यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, २० जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता तारापूर येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास माजी राज्यमंत्री आमदार श्री. राजेंद्र गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विकास संपत नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच मोहम्मद वाला ट्रस्टचे श्री. खालेकुल जमान तारापूरवाला, वरिष्ठ व्यवस्थापक कोकूयो कॅम्लिन, श्री. अजित राणे, ॲड. आझीझुर्रहमान गवंडी (मुंबई), श्रीमती संध्या पागधरे (सरपंच, तारापूर) हेही उपस्थित राहणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष श्री. साबीर शेख, सचिव वाहिद शेख व खजिनदार नसीर शेख यांनी कळविले आहे.



