नवी मुंबई : गुरुवर्यांचा सन्मान आणि संस्कृतीची जोपासना करण्याच्या उद्देशाने स्वरवंदन संगीत अकॅडमी, कोपरखैरणे यांच्या वतीने रविवार, २७ जुलै २०२५ रोजी भव्य गुरुपौर्णिमा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत, गणोबा गणेश मंदिर, तीन टाकीजवळ, कोपरखैरणे येथे पार पडणार आहे.
गुरुवर्य राष्ट्रभूषण शाहीर रूपचंद चव्हाण यांच्या शुभाशीर्वादाने होणाऱ्या या सोहळ्यात अनेक सांस्कृतिक मान्यवर, कलावंत आणि गुरुभक्त उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या संगीत सादरीकरणासोबतच गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. स्थानिक नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून गुरुपौर्णिमेचा मंगलसोहळा अनुभवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.