ताज्या बातम्या

सैनिक फेडरेशनची आढावा बैठक दादर येथे संपन्न होणार

प्रतिनिधी : सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य – जिल्हा मुंबई यांच्यावतीने 26 जुलै कारगिल विजय दिवससैनिक फेडरेशन वर्धापन दिन कार्यक्रमाच्या तयारीसाठी एक आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक बुधवार, 9 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता शाहू सभागृह, शिवाजी मंदिर ट्रस्ट, दादर, मुंबई येथे होणार आहे.

या बैठकीत 26 जुलै रोजी मुंबई CSMT येथील शहीद स्मारकाजवळ होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे. यामध्ये पाहुण्यांसाठी निमंत्रणपत्रिका, मान्यवरांची सत्कार यादी, एनसीसी/एनएसएस विद्यार्थ्यांना देण्यात येणारी प्रमाणपत्रे व अन्य आवश्यक बाबींवर चर्चा होणार आहे.

सर्व ग्रेटर मुंबईतील सैनिक, संघटनांचे पदाधिकारी व सैनिक मित्रांनी या बैठकीस उपस्थित राहून आपले मौल्यवान मार्गदर्शन व सहकार्य द्यावे, असे आवाहन डी. एफ. निंबाळकर, जनरल सेक्रेटरी, सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top