महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने चित्रमहर्षीं दादासाहेब फाळके यांची १५४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी चित्रनगरी परिसरात असलेल्या स्व.दादासाहेब फाळके यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी चित्रपट क्षेत्रातील मान्यवर, महामंडळाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.