प्रतिनिधी : आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा ने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संपूर्ण राज्यभरात सामाजिक न्याय दो अभियानाचा माध्यमातून विदर्भ, मराठवाडा खानदेश,पच्छिम महाराष्ट्र, मुंबई सह कोकणात स्थानिक जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदने सादर करण्यात आली.
राज्यभरातुन देण्यात आलेल्या निवेदनावर उचित कार्यवाही करण्यात यावी यासाठी १० जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अनुसूचित जाती जमातीच्या समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांवर बिनबुडाचे आरोप लावून त्यांना बदनाम करून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या पर्यंत मजल मारणारे निलंबित समाजकल्याण अधिकारी बाबासाहेब देशमुख, गुन्हे दाखल असणारे रविंद्र कोटंबकर, सुशिल शिंदे, यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अन्वये पायबंद करणे, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अन्वये प्रलंबित गुन्ह्यांचा जलद गतीने तपास करणे, रमाई घरकुल योजना जलदगतीने राबविणे, दादासाहेब गायकवाड स्वाभिमान स्वावलंबी योजनांची अंमलबजावणी करणे इत्यादी मागण्यांचा समावेश होता.
नागपूर विभागीय आयुक्त यांनी नुकतीच संबंधित अधिकारांची बैठक घेऊन संबंधित प्रकरणे निकाली काढण्यात यावे असे आदेश पारित केले त्या मध्ये विशेष अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अन्वये प्रलंबित गुन्ह्यांचा तपास, तसेच समाजकल्याण मंत्री यांनी मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थाने अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना जास्त प्रमाणात पैसे मागणाऱ्या काॅलेज वर कार्यवाही करण्याबाबत आदेश,व इत्यादी मागण्यांचा निराकरण साठी उचललेले पाऊल हे स्वागतात आहे या साठी शासनाचे अभिनंदन बागडे यांनी केले.