Friday, July 4, 2025
घरमहाराष्ट्रशेतकऱ्याप्रमाणे " शेतकरी " मासिक आत्महत्येच्या वाटेवर

शेतकऱ्याप्रमाणे ” शेतकरी ” मासिक आत्महत्येच्या वाटेवर

मुंबई(रमेश औताडे) : ए आय ( कृत्रिम प्रज्ञा ) च्या आधुनिक क्रांतीत नियतकालिके पण हायटेक होत कात टाकत आहेत. मात्र सरकारचे शेतकरी मासिक मात्र अजून धूळ झटकून कात टाकायला तयार नाही. शेतकरी मासिकाची कात टाकत नव्याने नीट बसवली नाही तर बळीराजा प्रमाणे हे शेतकरी मासिक आत्महत्येची वाट धरेल. शेतकऱ्यांना एकेकाळी आशेचा किरण वाटणारे हे मासिक आता शेतकऱ्यांनाच सांगू लागलं आहे की, तुझं दुःख मला कळतंय, पण मीच आता संपायला आलोय !

राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतीची माहिती, बाजारभाव, हवामानाचा अंदाज, शेतीविषयक कायदे, सरकारच्या विविध योजना, घरकुल मिळवताना नेमके काय करावे, शेततळे कोणाला मिळेल अशा अनेक प्रकारच्या नियमावली धोरणाची माहिती देणारे शेतकरी मासिक जुन्या बातम्या व जुने लेख देत असल्याने शेतकऱ्यांना त्याचा काहीच उपयोग होत नाही. म्हणजे पाऊस आला पूर आला सर्व नुकसान झाले मग शेतकरी मासिक शेतकऱ्यांच्या हातात येते. असा हा प्रकार सरकारने सुधारावा अशी मागणी शेतकरी करू लागले आहे.

या मासिकाचे योग्य नियोजन केले की शेतकरी आत्महत्या कमी होतील, जे प्रगतशील शेतकरी आहेत त्यांच्या मार्गात भविष्याचा वेध घेणाऱ्या शेतीची माहिती असणारे संपादकीय लेख असणे गरजेचे आहे. यात सुधारणा केली नाही तर शेतकऱ्याप्रमाणे हे मासिक आत्महत्येच्या मार्गावर जाईल.

राज्यभरात ४० हजार शेतकरी आपल्या शेताचे भले व्हावे म्हणून वर्गणी भरून वाचतात. मात्र त्यांना नवीन काहीच मिळत नाही. जगाने एवढी क्रांती केली आहे मात्र हा अंक शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाही. खाजगी अंक वेळेत मिळतात मग सरकारचा शेतकरी अंक वेळेत का मिळत नाही ? असा सवाल सोलापूरचे डाळिंब द्राक्ष प्रगतशील शेतकरी संजय पवार यांनी केला आहे.

आम्ही वर्गणी भरायची व अंक उशिरा वाचायचा असे का ? सरकारने शेतकऱ्यांना हा अंक मोफत दिला पाहिजे. ऑनलाइन सर्वत्र वाचायला मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या पिकावर गब्बर होणारे दलाल या अंकाच्या माध्यमातून जनजागृती करत दूर केले पाहिजेत.

कृषिमंत्री रोज नवनवीन कपडे घालतात अशी विरोधी पक्षांनी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खिल्ली उडवत समाज माध्यमावर चर्चा केली. हाच धागा पकडत कृषी मंत्र्यांनी या मासिकात नाविन्य आणावे. ए आय च्या क्रांतीत कृषी क्रांती ची बीज नव्याने रुजवली तर बळीराजा हे शेतकरी मासिक आनंदाने वाचण्यासाठी सज्ज होईल. नाहीतर शेतकऱ्याप्रमाणे हे मासिक पण आत्महत्या करेल.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments