Friday, July 4, 2025
घरमहाराष्ट्रमानसिक तणावामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती ; विद्यार्थ्यांचे प्रबोधन आणि समुपदेशन आवश्यक...

मानसिक तणावामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती ; विद्यार्थ्यांचे प्रबोधन आणि समुपदेशन आवश्यक ; युवासेनेचे प्र कुलगुरुंना साकडे

मुंबई, दि.२/७/२५ (प्रतिनिधी) : विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा तिसऱ्या मजल्यावरून पडुन दुर्दैवी मृत्यु झाला. या घटनेची गंभीर दखल शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री. आदित्य ठाकरे यांनी घेतली असून युवासेना सिनेट सदस्यांना त्यांनी केलेल्या सूचनेनुसार मुंबई विद्यापीठाचे प्र कुलगुरु डॉ. अजय भामरे यांची शिवसेना उपनेत्या सौ. शितल शेठ देवरुखकर, श्री.प्रदीप सावंत, शशिकांत झोरे आणि माजी सिनेट सदस्य श्री. राजन कोळंबेकर यांनी भेट घेतली. या भेटीत त्यांनी सध्याची सामाजिक परिस्थिती, पालकांच्या विद्यार्थ्यांकडून वाढलेल्या अपेक्षा, तरुणांना दिवसेंदिवस वाढत चाललेला अंमली पदार्थ सेवनाचा विळखा, यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता ढासळत चालली आहे. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी त्यांचे प्रबोधन होणे अत्यावश्यक आहे. त्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांमध्ये किमान एक समुपदेशक नेमून विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून मुक्त करण्यास सहकार्य करावे तसेच विद्यार्थ्यांचा वावर असलेल्या प्रत्येक परिसरात सी सी टीव्ही बसविण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी आग्रही मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे.*

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments