प्रतिनिधी :
शुक्रवारी २७ जून २०२५ रोजी रुग्णाला रुग्णालयात घेऊन जात असताना जळगाव जिल्ह्यातील पारोडा लोकेशन वर कार्यरत असणारी MH 14 CL 1317 क्रमांकाची रुग्णवाहिका रुग्णाला रुग्णालयात घेऊन जात असताना अचानक तिच्या इंजिन मधून धूर येताना जाणवले.पायलट आणि डॉक्टरांच्या प्रसंगावधान राखून रुग्णाला जळत असलेल्या रुग्णवाहिका मधून खाली उतरवले काही वेळाने त्या रुग्णवाहिकेने मात्र पेट घेण्यास सुरवात केली केली.मात्र पायलट आणि डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.मात्र या गोष्टीमुळे BVG आणि सुमित यांच्या कार्यक्षमतेवर मात्र प्रश्न उपस्थित होत आहेत.नादुरुस्त रुग्णवाहिका,त्यांची दयनीय स्थिती अगदी जीव मुठीत घेऊन या रुग्णवाहिकांचे पायलट रुग्णवाहिका चालवत असल्याचे वारंवार दिसत आले आहे.तरी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी असे नागरिकांचे मत आहे.