ताज्या बातम्या

केदार स्पीच अँड हिअरिंग क्लिनिकची सुविधा सातार्‍यात

(अजित जगताप)
सातारा दि: छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा शहरांमध्ये कर्णबधिर व मूकबधिरांसाठी केदार स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक सुविधा सुरू झालेली आहे. आता पुणे-मुंबई ऐवजी सातार्‍यात ही यंत्रणा मिळत असल्याने आता ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे या म्हणी प्रमाणे आता ऐकावे स्पष्टपणे जनाचे आणि बोलावे केदार स्पीच अँड हिअरिंग चे अशी म्हण अस्तित्वात येणार आहे.
सातारा नगरपालिके समोर असलेल्या शकुंतला हाईट्स, हॉटेल ऋतू शेजारी केदार स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक सुरू झालेले आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व डब्ल्यू एस ए आयडॉलॉजी इंडिया सिंग्निया हिअरिंग कंपनीचे सीईओ अविनाश पवार आणि केदार क्लिनिकचे संचालक केदार संकपाळ, मयुरी हुबळी, जयप्रकाश इंगळे, बाळासाहेब खंदारे, गौतम यांच्या उपस्थितीमध्ये त्याचे उद्घघाटन मोठ्या थाटात करण्यात आले. या कार्यक्रमाला के चक्रवर्ती हेसुद्धा उपस्थित होते.
गेली बारा वर्षे महाराष्ट्रातील विविध ठिकाणी श्रवण व वाचा उपचार तज्ञ म्हणून कार्यरत असणारे केदार संकपाळ यांच्या संकल्पनेतून आतापर्यंत सातार्‍यात 500 कर्ण व मूकबधिर रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. या रुग्णांवर योग्य उपचार झाल्यामुळे अनेकांना आता या श्रवण यंत्राचा उपयोग झालेला आहे. सिग्निया हिअरिंग या नामांकित ब्रँडची यंत्रणा सध्या जगभर नावलौकिक प्राप्त करत आहे. जर्मन कंपनीचे हे श्रवण यंत्र लहान बाळांपासून ते वयोवृद्ध लोकांना फायदेशीर ठरू लागलेले आहे.

फोटो – सातारा येथे केदार स्पीच अँड हिअरिंग क्लिनिकच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांची भेट. (छाया : अजित जगताप, सातारा)

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top