ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

कविता डॉट कॉमचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा होणार प्रवीण दवणे, अरुण म्हात्रे प्रमुख पाहुणे; राजेंद्र घरत यांना जीवनगौरव पुरस्कार

नवी मुंबई : नवोदित कवींना लेखनासाठी व्यासपीठ देणारी ‘कविता डॉट कॉम’ ही साहित्यिक संस्था आपल्या तिसऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. हा सोहळा रविवार, २२ जून २०२५ रोजी सकाळी नवी मुंबईच्या साहित्य संग मंदिरात संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी, वक्ते प्रवीण दवणे सर आणि ज्येष्ठ कवी, लेखक अरुण म्हात्रे उपस्थित राहणार आहेत. यावेळी नवी मुंबई महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे सर हे प्रवीण दवणे यांची मुलाखत घेणार आहेत.

कार्यक्रमात ‘कविता डॉट कॉम’ चे लेखक व उपसंपादक राजेंद्र घरत यांना त्यांच्या दीर्घकालीन साहित्यसेवेबद्दल जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात येणार आहे.

या संस्थेची स्थापना प्रा. रवींद्र पाटील यांनी नवोदित कवींसाठी एक भक्कम व्यासपीठ उभारण्याच्या उद्देशाने केली. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत विविध वयोगटातील साहित्यप्रेमी या संस्थेशी जोडले गेले आहेत. साहित्याच्या क्षेत्रात सातत्याने होत असलेली गुणवत्ता आणि प्रोत्साहन हेच प्रा. पाटील सरांचे खरे बळ असल्याने ‘कविता डॉट कॉम’ चे उपक्रम महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी यशस्वीपणे राबवले जात आहेत.

या खास दिवशी अनेक साहित्यिक, कवी, रसिक यांची उपस्थिती लाभणार असून नवी मुंबईत एक सुंदर साहित्यिक वातावरण निर्माण होणार आहे.

Scroll to Top