ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

पंढरपूर वारीसाठी वैष्णव ट्रस्टची ३२वी मोफत आरोग्यसेवा सुरु

प्रतिनिधी : पंढरपूर वारीच्या मार्गावर वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या वैष्णव चॅरिटेबल अ‍ॅण्ड मेडिकल ट्रस्टच्या ३२व्या वर्षीच्या आरोग्य सेवेचा प्रस्थान सोहळा कुर्ल्यातील नेहरूनगर येथील केदारनाथ मंदिरात पार पडला. या कार्यक्रमाला एम.जी.एम. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. अडसूळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

ट्रस्टची स्थापना १९९६ साली दिवंगत श्री हणुमंतराव महांगडे आणि श्री विजय कासुर्डे यांच्या संकल्पनेतून झाली. वारीदरम्यान अनेक वारकऱ्यांना मधुमेह, ताप, अशक्तपणा, पायांचे घर्षण, सर्दी-खोकला यांसारख्या त्रासांना सामोरे जावे लागते. यासाठी ट्रस्टकडून मोफत उपचार व सुविधा पुरवली जाते.

या वर्षी ८० डॉक्टर, ४०० सेवेकरी, ३ सुसज्ज ॲम्बुलन्स, एलोपॅथी व होमिओपॅथी औषधसामग्री, तसेच गंभीर रुग्णांसाठी ॲम्बुलन्सद्वारे रुग्णालयात दाखल करण्याची सोय करण्यात आली आहे.

वारकऱ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे कार्यवाह श्री विजय कासुर्डे (संपर्क: ९८१९६ ९७५४५) यांनी केले आहे.

Scroll to Top