ताज्या बातम्या

सोळशी धरण प्रकल्पाला आठ गावांचा तीव्र विरोध; नवी मुंबईतील घणसोली बैठकित एकमत

सोळशी धरण प्रकल्पाला आठ गावांचा तीव्र विरोध; संघर्ष समितीचा एक मताने ठराव

प्रतिनिधी (भीमराव धुळप) : महाबळेश्वर तालुक्यातील येरणे खुर्द, येरणे बुद्रुक, आचली, मजरेवाडी, देवसरे, घावरी, विवर आणि सौंदरी या आठ प्रकल्पग्रस्त गावांनी सोळशी धरण प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला आहे. नवी मुंबईतील घणसोली येथे झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी एकमताने ठराव करून स्पष्ट केले की, सरकारने मागण्या मान्य केल्याशिवाय धरण प्रकल्पास कोणतीही संमती दिली जाणार नाही.या बैठकीत माजी सभापती संजय बाबा गायकवाड यांनी सांगितले की, त्यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्याशी थेट संवाद साधून गावकऱ्यांच्या मागण्या पोहोचवल्या असून, “आपल्याला शंभर टक्के न्याय मिळेल,” असा विश्वास व्यक्त केला.बैठकीसाठी आठही गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. “आम्हाला विकासाला विरोध नाही, पण जमिनींचा योग्य मोबदला, पुनर्वसन आणि हक्काची घरे मिळाल्याशिवाय प्रकल्पास मान्यता नाही,” असा ठाम सूर बैठकीतून उमटला.सोळशी सामाजिक संघर्ष समितीने लढ्याचे नेतृत्व करण्याचा निर्धार व्यक्त करत न्याय न मिळाल्यास तीव्र लोकशाही आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.या बैठकीला महाबळेश्वर पंचायत समितीचे माजी सभापती संजूबाबा गायकवाड, सोळशी सामाजिक संघर्ष समितीचे अध्यक्ष विश्वनाथ घाडगे, संतोष आप्पा जाधव – शिवसेना महाबळेश्वर तालुकाप्रमुख, 12 गावं संघर्ष समिती प्रमुख, प्रकाश गायकवाड, शिवसेना उपविभाग प्रमुख पनवेल, रमेश सकपाळ, शिवसेना शाखाप्रमुख गोरेगाव विभाग, अंकुश मोरे उद्योजक, विलास जाधव सर सौन्दरी, अरुण गुरुजी मोरे येरणे, 12 गाव समाज उपाध्यक्ष, श्रीरंग मोरे – प्रमुख सल्लागार , विश्वनाथ घाडगे – अध्यक्ष, रमेश जाधव उपाध्यक्ष, सुनील जाधव – उद्योजक घावरी गाव : तानाजी सकपाळ , प्रकाश सकपाळ, येरणे खुर्द : राजेंद्र घाडगे- पाटील, महेंद्र घाडगे, येराणे बुद्रुक : सतीश मोरे : सहसचिव अरुण मोरे गुरुजी – 32 गावं सचिव, देवसरे : रमेश जाधव :उपाध्यक्ष, चंद्रकांत जाधव, आचली: गणेश गायकवाड :खजिनदार, मजरेवाडी : सुनील जाधव – उद्योजक शैलेश जाधव, येरणे खु.:नितीन दादा घाडगे सचिव, सौन्दरी : सुनील गुरुजी सोंदरी आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खालील बातमी ही युट्यूब लिंक आहे ती जरूर पाहावी

https://youtu.be/AZdleaB5uaw?si=2pa_UDlEwGfg9cRA

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top