ताज्या बातम्या

घरकामगार दिनानिमित्त “प्रयास एक कोशिश” आणि समन्वय समितीची पत्रकार परिषद; सर्वोच्च न्यायालयाची अंमलबजावणी करा मागणी

मुंबई : प्रयास एक कोशिश आणि घरेलू कामगार वस्ती विकास संघ संलग्न महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती यांच्या वतीने १६ जून रोजी जागतिक घरकामगार दिनानिमित्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. ही परिषद मुंबई मराठी पत्रकार संघात पार पडली.

२०१० मध्ये आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने (ILO) घरकामगारांना कामगाराचा दर्जा देणारा १८९ क्रमांकाचा ठराव मंजूर केला होता. मात्र, आजतागायत भारतात केंद्रीय घरकामगार कायदा अस्तित्वात नाही. उत्तराखंडमधील एका घरकामगार महिलेच्या शोषणाच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला तातडीने कायदा करण्याचा आदेश दिला असून, त्यासाठी समिती गठीत करण्यास सांगितले आहे.

या पार्श्वभूमीवर देशभरातील संघटना घरकामगारांच्या हक्कासाठी विविध उपक्रम राबवत आहेत. कार्यक्रमाला राजू वंजारे, ज्ञानेश पाटील, शांता खोत, मंगला बावस्कर, ललिता सरोदे, निता मोहिते, आशिष शिगवण, यासिन कुरेशी आदी उपस्थित होते. माध्यमांनी या कार्यक्रमाला योग्य प्रसिद्धी द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top