ताज्या बातम्या

भाजपा २०२४ ची निवडणूक जिंकली कशी? या ज्येष्ठ पत्रकार तुलसीदास भोईटे यांच्या पुस्तकाचे आज प्रकाशन

मुंबई-शुक्रवार (सदानंद खोपकर)- महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक-२०२४, मध्ये धक्का बसलेली भाजपा विधानसभेला मात्र महाविजय कसा मिळवू शकली या विषयावरील ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास यांनी अभ्यासपूर्वक लिहिलेल्या भाजप जिंकली कशी, या पुस्तकाचे प्रकाशन आज शुक्रवारी सायंकाळी
मुंबई मराठी पत्रकार संघात होत आहे.
भाजप जिंकली कशी, या पुस्तकात आकडेवारीसह आणि विश्लेषण करीत लेखक भोईटे यांनी आपले निष्कर्ष मांडले आहेत. २०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाचं कोडं यातून उलगडेल असा दावा ते करतात.
सायंकाळी ४ वाजता पत्रकारिता, साहित्य, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत होत असलेल्या या प्रकाशन कार्यक्रमाआधी गुजरातमधील अहमदाबाद येथे घडलेल्या विमान अपघातात गेलेल्या प्रवाशांना श्रद्धांजली वाहण्यात येईल.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top