मुंबई(,विवेक पाटकर) :- ९ जूनला मुंबईत मोठा रेल्वे अपघात झाला. मुंब्रा स्टेशनजवळ लोकलमधून पडून १३ प्रवासी जखमी झाले. तर, या अपघातात ४ प्रवाशांचा मृत्यू झाला. मुंब्रा रेल्वे अपघाताबाबत धक्कादायक अपडेट समोर आली आहे. लोकलमधील प्रचंड गर्दीमुळे काही प्रवासी डब्याच्या दरवाज्यात (फूटबोर्ड) लटकत उभे होते. त्याचवेळी बाजूने जाणारी लोकल या प्रवाशांना घासून गेली. या लोकलच्या धक्क्याने प्रवासी खाली पडल्याने हा अपघात झाल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, दोन लोकल एकमेकांना घासल्याने अपघात झालाच नाही असा दावा रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.*
मुंब्रा रेल्वे अपघाताबाबत धक्कादायक अपडेट!… दोन लोकल एकमेकांना घासल्याने अपघात झालाच नाही?
RELATED ARTICLES