प्रतिनिधी(रमेश औताडे) : मुंबईत रेल्वेत बाँम्ब ब्लास्ट करुन मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या याकूब मेमनला फाशी व्हावी म्हणून न्यायालयात युक्तिवाद करणारे, मुंबईवर हल्ला करणाऱ्या कसाबला फाशी व्हावी म्हणून आवश्यक पुरावे व या कटातील पाकिस्तानचा सहभाग उघड करुन जगासमोर पाकिस्तानला उघडे पाडणारे अँड उज्वल निकम यांना लोकसभेची उमेदवारी म्हणजे मुंबईकरांसाठी लढणाऱ्या सच्चा मुंबईकरांचा हा सन्मान असून उज्वल निकम हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी व्यक्त केला.
उत्तर मध्य लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार ज्येष्ठ विधितज्ञ अँड उज्वल निकम यांचा पक्ष प्रवेश करुन त्यांचे जोरदार स्वागत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी केले. अँड उज्वल निकम म्हणजे एक सच्चा मुंबईकर आणि योध्दा निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत, अशी प्रतिक्रिया अँड आशिष शेलार यांनी दिली.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अँड उज्वल निकम यांचे उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे विलेपार्ले येथील कार्यालयात ढोलताशांच्या गजरात
जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी अँड पराग अळवणी, शिवसेना नेते डॉ दीपक सावंत, विवेक पवार, माजी आमदार तृप्ती सावंत यांच्यासह युतीचे सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
उज्वल निकम यांनी आपल्या भाषणात , संधी देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रीय, प्रदेश अध्यक्ष आणि भाजपा मुंबई अध्यक्षांचे आभार मानले. ज्या पध्दतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशाच्या विकासासाठी काम करीत आहेत, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा बहुमान त्यांनी वाढवला ते पाहून आपल्याला त्यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळणे हा माझा बहुमान समजतो, अशी भावना निकम यांनी व्यक्त केली.
.