मुंबई (शांताराम गुडेकर) : कोकण कट्टा विलेपार्ले तर्फे यंदा ९ व्या वर्षीही माणुसकीची भिक्षाफेरीतून साईधार या संस्थेला दोन हजार किलो तांदूळ व डाळ अशी संकलन केलेली मदत करण्यात आली. श्री स्वामी समर्थ मठ विलेपार्ले यांच्या विशेष सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरित्या सुरू आहे.बालग्राम पनवेल व सह्याद्री संस्था देवबांध येथे ही अन्नधान्य देण्यात येणार आहेच.साई आधार ही निराधार मुलांना घरपण देणारी संस्था आहे.विशाल परुळेकर यांच्या या आश्रमात जाऊन प्रत्यक्ष भेट घेण्यात आली.कोकणकट्टा संस्थापक अजित पितळे, मार्गदर्शक जगन्नाथ गावडे,खजिनदार सुजित कदम,विवेक वैद्य, प्रथमेश पवार, प्रभाकर खेडेकर, मनिष माईन, निशी मोरे, सचिन माने,अथर्व मुरमुरे उपस्थित होते.उदय कौलकर यांनी मुलांना पेन तर रवी तांबे यांनी मुलांना सकाळचा अल्पोपाहार व संजय कदम यांनी केक अशा भेट वस्तू दिल्या.




