Tuesday, July 29, 2025
घरमहाराष्ट्रकोल्हापूरगडकिल्ल्यांच्या सायकल यात्रेवर असलेला युवक बेळगावात

गडकिल्ल्यांच्या सायकल यात्रेवर असलेला युवक बेळगावात

बेळगाव : उत्तराखंड येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 गडकिल्ल्यांना सायकलवरून भेट देणाऱ्या कार्तिक सिंग याचे आज बेळगावात आगमन झाले. गेल्या 24 डिसेंबर 2024 पासून सुरू असलेल्या या यात्रेदरम्यान त्याने 5000 किमीचा प्रवास करत आतापर्यंत 64 किल्ले पाहिले आहेत.

शिवप्रेमी कार्तिकने सांगितले की, युवांनी इतिहास जपावा आणि गडकिल्ल्यांचे संवर्धन करावे. बेळगावात श्रीराम सेना हिंदुस्तानकडून त्याचे स्वागत झाले असून पुढील मुक्काम रायगड येथे होणार आहे. 6 जून रोजी रायगडावरील राज्याभिषेक सोहळ्याचे चित्रिकरण देशभर पोहोचवण्याचा त्याचा मानस आहे. भविष्यात शिव-धर्मवीरांची मूर्ती बनवण्यासाठी प्रत्येक किल्ल्याची माती गोळा करून तो मोटरसायकल प्रवासही करणार आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments