Tuesday, July 29, 2025
घरमहाराष्ट्रऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलतर्फे २०२५ चे पुरस्कार जाहीर; जीवन गौरव शैलेंद्र...

ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलतर्फे २०२५ चे पुरस्कार जाहीर; जीवन गौरव शैलेंद्र शिर्के यांना तर दैनिक पुढारीचे वैभव पाटील यांचाही पुरस्कारामध्ये समावेश

नवी मुंबई/ प्रतिनिधी : पत्रकारिता, सामाजिक कार्य, प्रशासन आणि ग्रामीण सेवेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या संस्थेच्या वतीने २०२५ सालचे पुरस्कार जाहीर करण्यात आले. यंदाचा जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध पत्रकार आणि दैनिक पुण्यनगरीचे मुंबई,ठाणे आवृतीचे संपादक शैलेंद्र शिर्के यांना जाहीर झाला असून त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल हा मान देण्यात आला आहे.

संस्थेचे विश्वस्त अतुल होनकळसे यांनी पत्रकार परिषदेत पुरस्कारांची घोषणा केली. संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल आणि केंद्रीय अध्यक्ष गणेश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय व निवड समितीने पुरस्कारप्राप्त मान्यवरांची निवड केली.
या कार्यक्रम अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई असणार असून सोहळ्याला राजकीय, सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रामशेठ ठाकूर, नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, आमदार महेंद्रशेठ दळवी, विरोधी पक्षनेते प्रितमशेठ म्हात्रे, पद्मश्री गिरीश प्रभुणे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार प्रशांतशेठ ठाकूर, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल संघटनेच्या केंद्रीय अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी, राज्य अध्यक्ष विठ्ठल मोघे, माजी सभापती बाळासाहेब पाटील, आमदार विक्रांत पाटील, व महेंद्रशेठ घरत (अध्यक्ष, रा.जि. काँग्रेस) यांची उपस्थिती असणार आहे.

पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे :

१ ) आचार्य बाळशास्त्री जांभेकर मराठी पत्रकार राज्य पुरस्कार – श्री किशोर आबीटकर गारगोटी

२ ) दैनिक सागर संपादक नानासाहेब जोशी स्मृती राज्य पुरस्कार – श्री वैभव पाटील दैनिक पुढारी सातारा

३) मूकनायक वर्तमानपत्राचे पहिले संपादक पांडुरंग नंदराम भटकर मूकनायक पत्रकारिता पुरस्कार- श्री.दत्तात्रय उकिरडे अहिल्यानगर दै. सकाळ

४) साप्ताहिक ससेमिरा संपादक मधुकर लोंढे स्मृती ग्रामीण वार्ताहर पुरस्कार -दीपक घोसाळकर, नवी मुंबई, दैनिक पुढारी

५) भंडारी समाज नेते स्व.शरददादा बोरकर ग्रामीण कार्यकर्ता राज्य प्रेरणा पुरस्कार – संतोष ढोरे , पनवेल , वृद्धाश्रम सेवा

६) कर्तव्यदक्ष अधिकारी राज्यस्तरीय पुरस्कार- श्री सुनील आटपाडकर
एमएमआरडीए प्राधिकरणात सामाजिक विकास अधिकारी
मुंबई

७ ) दलितमित्र रमाकांत आर्ते स्मृती सामाजिक कार्यकर्ता राज्य पुरस्कार – बजरंग सोनवणे ,मुंबई

८) वरिष्ठ पत्रकार नवीन सोष्टे स्मृती विभागीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार- निलेश नवघरे , अकोट तालुका दैनिक तरुण भारत

९) मधु रावकर पत्रकार प्रेरणा पुरस्कार- दयानंद मांगले,देवगड

१०) जयानंद मठकर स्मृती विभागीय मराठी पत्रकार पुरस्कार -प्रकाश वळंजू ,राजापूर

सन्मान समारंभ ७ जून रोजी पनवेलमध्ये
या पुरस्कारांचे वितरण सोहळा ७ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, शिवाजी चौक, जुने पनवेल येथे पार पडणार आहे.

कार्यक्रमाचे संयोजन संजय पवार (पनवेल) यांनी केले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments