तापोळा(नितीन गायकवाड) सोळशी विभाग विकास कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मर्या. गोगवे या संस्थेची संचालक मंडळाची निवडणूक सन २०२५ ते २०३० साठी बिनविरोध पार पाडली. संस्थेच्या चेअरमन पदाची जबाबदारी युवा नेते संतोष मोरे यांच्यावर देण्यात आली. व्हा. चेअरमन पदाची निवड सखाराम संकपाळ यांची करण्यात आली.
या निवडीनंतर भेटीगाठीमध्ये महाबळेश्वर् तालुक्याचे माजी सभापती संजय (बाबा) गायकवाड म्हणाले, महायुतीचे धोरण स्वीकारुन संस्थेची बिनविरोध निवडणूक करण्यात यशस्वी झालो आणि पुढच्या पिढीला एक आदर्श निर्माण करुन ठेवला आहे. तो नविन संचालक मंडळाने तशा पद्धतीने कारभार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. संस्थेचे जेष्ठ् मार्गदर्शक बाबुराव दादा संकपाळ म्हणाले नवीन संचालक मंडळाने आपला स्वच्छ कारभार करुन संस्थेला अजून नावारुपाला भरभराटीला आणून सर्व सभासदांना न्याय मिळवून द्यावा व नवनविन योजना राबवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.
या निवडीबद्दल मा. ना. मकरंदआबा पाटील मदत व पुनर्वसन मंत्री महाराष्ट्र राज्य्. मा. राजेंद्रशेठ राजपुरे-संचालक सातारा जिल्हा बँक, मा. संजय (बाबा) गायकवाड – माजी. सभापती पंचायत समिती महाबळेश्वर्, मा. बाबुराव दादा संकपाळ माजी. जि. प. सदस्य् मा. धोंडीबा जंगम, माजी जि. प. सदस्य् मा. सुभाषशेठ कदम माजी संचालक जावली बँक, मा. वसंतशेठ शिंदे १०५ गाव समन्वय् समिती प्रमुख, मा. गणेश भोसले संचालक जावली बँक मुंबई, मा. संजय संकपाळ (गुरुजी) संचालक शिक्षक बैंक सातारा आदी मान्यवरांनी निवडीबद्दल अभिनंदन केले.