ताज्या बातम्या

शाहूपुरी डोंगर माथ्यावर वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाने दिसला सामाजिक एकोपा….

शाहूपुरी(अजित जगताप) : निसर्गरम्य परिसर म्हणजे पर्यटन असते. हिरव्यागार वृक्षवल्लीमुळे मानवी जीवनामध्ये उत्साह निर्माण होतो. ऑक्सिजन मिळते. याची जाणीव ठेवून स्वस्तंभ फिटनेस, वनविभाग, सातारा नगरपालिका आणि आय.टी.आय. सातारा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने शाहूपुरी परिसरात स्वामी समर्थ मंदिर मागील डोंगरावर मोठ्या उत्साह मध्ये वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाची किमया करण्यात आली. यावेळी सामाजिक एकोप्याचेही दर्शन झाले. सातारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राहुल जाधव, अजित जगताप, नगरसेविका विमल गोसावी, नगरसेविका शारदा वाघमोडे, आयटीआय प्राचार्य शामली पवार, नगरसेवक विश्वतेज बालगुडे व हॉटेल चंद्र विलास उद्योजक वसंत जोशी, आधार जनरल हॉस्पिटलचे डॉक्टर कबीर मुलाणी व सातारा नगरपालिका पाणीपुरवठा अभियंता तथा उच्च विभाग प्रमुख दिग्विजय गाढवे, वन विभागाचे वनरक्षक विश्वास मिसाळ,वनरक्षक एन एच कोळेकर, जीवन पवार, बाळासाहेब गोसावी, महानवर तसेच स्वास्थम फिटनेसचे सर्व सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या कुटुंबासह सहभागी झाले होते. सकाळी नऊ वाजल्यापासून शाहूपुरी डोंगर माथ्यावर वृक्षारोपणासाठी लहान मुलं ते वयोवृद्ध सेवानिवृत्त अधिकारी तसेच माता भगिनी हातात कुदळ- फावडे आणि पाणी घालण्यासाठी बादली घेऊन आले होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध वृक्षारोपण करण्यात आले. प्रत्येकाने खड्डे काढण्यासाठी परिश्रम घेतले. वृक्षारोपणासाठी लागणारे पाणी त्या ठिकाणी आणण्यासाठी प्रयत्न केले. पावसाळ्यात ओढ्याला पाणी आल्यामुळे हे पाणी सर्व वृक्षाला लावण्यासाठी साथी हात बढाना ..साथी रे.. अशा पद्धतीने सर्वांनीच हातभार लावला. वनविभाग व सातारा नगरपालिकेच्या वतीने वृक्षरोपण साठी लागणारे सर्व गोष्टींची पूर्तता करण्यात येणार आहे. सातारा नगरपालिकेच्या वतीने पाण्याचे नळ कनेक्शन व उन्हाळ्यात टॅंकरने पाणी घालण्याची व्यवस्था केली जाईल. असा विश्वास पाणीपुरवठा अभियंता दिग्विजय गाढवे यांनी व्यक्त केला. यावेळी अनेकांनी टाळ्यांच्या गजरात त्याच्या स्वागत केले. या वृक्षारोपण वृक्ष संवर्धनाच्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने सामाजिक एकोपा आणि निसर्गाबद्दल असणारे प्रेम व्यक्त करण्यात आले. मान्यवरांनी या वेळेला वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रमाला सहकुटुंब फक्त भेट दिली नाही तर या वृक्षारोपण कार्यक्रमाला हातभार लावला. विशेषतः महिला व मुलींची संख्या लक्षणीय होती. स्थानिक रहिवासी असलेल्या वयोवृद्धांचेही आशीर्वाद लाभले. …………………………….. फोटो– शाहूपुरी येथे वृक्षारोपण करताना अनेक मान्यवर व सामाजिक कार्यकर्ते (छाया निनाद जगताप व सुमित पवार)

Scroll to Top