कराड(ज्ञानेश्वर शेवाळे) : महिलांच्या हाताला काम मिळावे, त्यांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे आणि स्वतःच्या कर्तृत्वावर समाजात आत्मविश्वासाने उभे राहावे, या उद्देशाने सातत्याने प्रयत्न करणाऱ्या येवती येथील उद्योजिका, भैरवनाथ वस्त्र भंडारच्या प्रोप्रायटर तसेच चंद्रभागा महिला औद्योगिक संस्थेच्या अध्यक्षा गौरीताई देसाई यांचा वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे.
व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतानाच सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम गौरीताईंनी केले आहे. विशेषतः महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या कौशल्याला योग्य दिशा देणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रोत्साहन देणे, हे त्यांच्या कार्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
‘महिला सक्षमीकरण केवळ बोलण्यात नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून घडले पाहिजे’, या विचाराने गौरीताईंची वाटचाल सुरू आहे. महिलांच्या अंगी असलेल्या विविध कौशल्यांना व्यासपीठ मिळावे, त्यांना उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात.
गौरीताईंच्या व्यक्तिमत्त्वात उद्योजकता, सामाजिक जाणीव, संवेदनशीलता आणि समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याची तळमळ यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. त्यामुळे येवती परिसरातील अनेक महिलांसाठी त्या प्रेरणास्थान, मार्गदर्शक आणि आत्मनिर्भरतेची प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व ठरत आहेत.
महिलांना सक्षम करून कुटुंबासोबतच समाजाच्या आर्थिक व सामाजिक विकासाला हातभार लावण्याचे त्यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कार्याची व्याप्ती भविष्यात आणखी वाढावी आणि त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक महिलांना रोजगार व स्वावलंबनाची नवी दिशा मिळावी, हीच अपेक्षा.
गौरीताई देसाई यांना वाढदिवसानिमित्त उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि भावी सामाजिक व औद्योगिक वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
आपल्या कार्यातून महिलांच्या आयुष्यात आत्मनिर्भरतेचा नवा प्रकाश सदैव पसरत राहो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!
पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे.




