मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघातर्पेâ ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि भारत–अमेरिका संबंधांवर अमेरिकेतील भारतीय वंशाचे पहिले मराठी खासदार डॉ. श्री ठाणेदार यांचा विशेष वार्तालाप सोमवार, दिनांक २६ मे २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
हा विशेष कार्यक्रम आझाद मैदानातील पत्रकार भवनाच्या सभागृहात, दुपारी १२ वाजता पार पडणार आहे.
या चर्चासत्रात डॉ. ठाणेदार अमेरिका आणि भारतातील राजकीय घडामोडी, जागतिक स्तरावरील परराष्ट्र धोरणे, तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाचा दृष्टिकोन या विषयांवर आपले विचार मांडतील.
या कार्यक्रमाला पत्रकार, संशोधक, अभ्यासक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. संदीप चव्हाण यांनी दिली.
ऑपरेशन सिंदूर’ आणि भारत-अमेरिका संबंधांवर अमेरिकन खासदार श्री ठाणेदार यांचा विशेष वार्तालाप
RELATED ARTICLES