प्रतिनिधी : मुंबईत मान्सूनपूर्व नालेसफाईसाठी प्रचंड निधी खर्च करण्यात आला. मात्र आजही श्रमजीवी नगर, वत्सलाताई नाईक नगर, क्रांती नगर, साबळे नगर या भागांतील परिस्थिती भीषण आहे. नाल्यांत गाळ, राडारोडा आणि कचरा तसाच पडून आहे. काही ठिकाणी काम सुरूच नाही, आणि जिथे झालंय असं सांगितलं जातं, तिथेही प्रत्यक्षात फसवणूक दिसते.
सत्ताधाऱ्यांचा आणि महापालिकेचा बेजबाबदार व भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा सामान्य मुंबईकरांना संकटात ढकलतो आहे. सत्ताधारी भ्रष्टाचाराचा मेवा खात आहेत, आणि जनता पावसात बुडते आहे. हे संतापजनक आहे!
आजच्या पाहणीत नालेसफाईच्या कामात मोठ्या त्रुटी आढळल्या. संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला असून, कामे तातडीने पूर्ण करण्याचा इशारा दिला आहे. ड्रेनेज लाईनचे तुटलेले काम (साबळे नगर – मेट्रोमुळे नुकसान) त्वरित दुरुस्त करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
मुंबई काँग्रेसची ठाम मागणी:
- नालेसफाई व रस्ते काँक्रिटीकरणातील भ्रष्टाचाराची ACB मार्फत सखोल चौकशी करा.
- दोषी कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करा.
- संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा.
शासनाने आणि महापालिकेने मुंबईकरांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये — अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल!