कराड (विजया माने) : महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागाअंतर्गत “गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” योजनेअंतर्गत, टाटा मोटर्स व नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कराड तालुक्यातील घारेवाडी (जि. सातारा) येथील तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ दिनांक २२ मे २०२५ रोजी करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रांताधिकारी श्री. अतुल म्हेत्रे, तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे, तालुका कृषी अधिकारी श्री. खरात, शिवम् प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील व खोत (तात्या), सर्कल अधिकारी जितेंद्र काळे, ल.पा. विभागाच्या कदम मॅडम, पत्रकार सरिता घारे, गावच्या सरपंच मॅडम, उपसरपंच, तलाठी, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ तसेच टाटा मोटर्स व नाम फाउंडेशनच्या टीमची उपस्थिती लाभली.
तलावातील गाळ काढल्यामुळे जलसाठा वाढून परिसरातील शेतीला पाणी उपलब्ध होणार असून, पर्यावरणपूरक उपक्रमातून ग्रामविकासाला चालना मिळणार आहे.