Tuesday, October 14, 2025
घरमहाराष्ट्रदुर्गम खेड्यातून यशाकडे: निलिमा कोरडे यांचे कार्यकारी सहाय्यक पदावर दैदिप्यमान यश

दुर्गम खेड्यातून यशाकडे: निलिमा कोरडे यांचे कार्यकारी सहाय्यक पदावर दैदिप्यमान यश

प्रतिनिधी : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एका दुर्गम आदिवासी खेड्यात जन्मलेली निलिमा जयराम कोरडे हिने आपल्या जिद्दीने आणि कष्टाने यशाचा शिखर गाठले आहे. रोजगाराच्या शोधात ठाण्यात आलेल्या कोरडे कुटुंबीयांनी चारही मुलींच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार केला होता. त्याच जिद्दीला साथ देत निलिमाने शिक्षणाची वाट चालण्यास सुरुवात केली.

तिने सुरुवातीचे शिक्षण ठाण्यातील स्थानिक शाळेत घेतले आणि पुढे मुलुंड येथील नामांकित केळकर कॉलेजमध्ये पदवी संपादन केली. त्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. चार बहिणींमध्ये सगळ्यात धाकटी असलेल्या निलिमाला अभ्यासाच्या प्रवासात अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागले. मात्र आई-वडील व मोठ्या बहिणींचा सततचा आधार तिच्या पाठीशी होता.

या वाटचालीत मेरिट आणि नॉर्मलायझेशनच्या प्रक्रियांनी कधी यश थांबवले, तरी निलिमाने खचून न जाता पुन्हा नव्या जोमाने तयारी केली. अखेर तिच्या परिश्रमांना यश मिळाले आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी सहाय्यक पदाच्या परीक्षेत तिने उत्तम यश संपादन केले.

ही यशोगाथा निलिमा कोरडे ही युनिक अकॅडमी, कल्याण येथील विद्यार्थिनी असल्याने त्या संस्थेसाठीही अभिमानास्पद ठरली आहे.

निलिमा कोरडे हिला पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments