मुंबई- नॅशनल लायब्ररी वांद्रे आणि सदामंगल पब्लिकेशन दादर यांच्या संयुक्त विद्यमाने अॅड. शफी काझी यांच्या ‘भोवरा’ या कादंबरीचा प्रकाशन सोहळा शनिवार २६ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता नॅशनल लायब्ररी,वांद्रे येथे पार पडणार आहे.
या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणुन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यां अॅड.मुक्ता दाभोळकर ,अध्यक्षस्थानी माजी महापौर अॅड. निर्मला सामंत-प्रभावळकर आणि विशेष निमंत्रित म्हणुन नाट्यनिर्माते,
दिग्दर्शक अशोक हांडे आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत,तरी साहित्य रसिकांनी या प्रकाशन सोहळ्याला अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन अॅड. सुनील पाटील यांनी केले आहे.