कराड ( प्रतिनिधी) : कराड ते चांदोली रस्त्यावर धोंडेवाडी फाटा येथे ट्रॅक्टर व दुचाकीच्या भीषण धडकेत दुचाकी वरील म्हासोली येथील विजय कुंभार हा तरुण जागीच ठार झाला असल्याची घटना घडली , घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सदर अपघात मंगळवारी सकाळी 9.30 दरम्यान झाला असल्याची माहिती मिळत आहे, म्हासोली ता.कराड येथील विजय कुंभार वय वर्ष 52 हे उंडाळे येथील शामराव पाटील पतसंस्थेचे कर्मचारी आहेत ते आपल्या दुचाकीवरून कराड या ठिकाणी कामानिमित्त निघाले होते सकाळी 9.30 दरम्यान धोंडेवाडी फाटा येथे आले असता ट्रॅक्टर आणि दुचाकी यांची जोरदार धडक झाली या भीषण धडकेत विजय कुंभार हे जागीच ठार झाले, विजय कुंभार उंडाळे येथील शामराव पाटील पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात कर्मचारी म्हणून कार्यरत होते़ सदरच्या घटनेचे नोंद करण्याचे काम कराड तालुका पोलीस स्टेशन वतीने सुरू आहे, या अपघाताचा अधिक तपास कराड तालुका पोलीस घेत आहेत .
धोंडेवाडी फाटा येथे ट्रॅक्टर व दुचाकीच्या भीषण अपघातात म्हासोली येथील तरुण जागीच ठार
RELATED ARTICLES