प्रतिनीधी : महाराष्ट्र शासन, सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक) यांच्यावतीने पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि रक्कम रु.10,000/- असे या प्रोत्साहनात्मक पुरस्काराचे स्वरुप आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहूल कदम, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शबनम मुजावर, उपशिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अर्चना वाघमळे व अन्य मान्यवर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी आपली पत्नी सौ.रेश्मा डाकवे, आई गयाबाई डाकवे, पौर्णिमा डाकवे, प्रथमेश डाकवे, गिरीश टिळेकर, चि.स्पंदन, कु.सांची यांच्या उपस्थितीत स्वीकारला.
‘वसा सामाजिक बांधिलकीचा’ हे ब्रीद वाक्य घेवून डाकेवाडी सारख्या दुर्गम भागात राहूनही डाॅ.संदीप डाकवे आणि त्यांचे सहकारी यांनी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शेकडो नावीण्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. लोकसहभागातून राबवलेल्या या उपक्रमांना समाजातून नेहमी उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक) यांनी ट्रस्टच्या कार्याची दखल घेत भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुरस्कार देऊन सन्मानित केले.
सातारा जिल्हा परिषदेचा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मिळाल्याबद्दल स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई, शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार ॲड.जनार्दन बोत्रे, सुप्रसिद्ध पार्श्वगायिका कविता राम, गटशिक्षणाधिकारी संभाजी कानवटे, पाटण तालुका बाजार समितीचे उपसभापती विलास गोडांबे, माजी पं.स.सदस्य पंजाबराव देसाई, बाळासाहेब कचरे, प्रा.ए.बी.कणसे, वांगव्हॅली पत्रकार संघ, सांची सुपरस्टार संघ, शिवछत्रपती प्रतिष्ठान डाकेवाडी, समस्त ग्रामस्थ मंडळ डाकेवाडी तसेच विविध संघटनांच्या पदाधिकारी यांच्यासह अन्य मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
झेड पी’ च्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुस्काराने ‘स्पंदन ट्रस्ट’ सन्मानित
RELATED ARTICLES