Saturday, September 20, 2025
घरमहाराष्ट्रअ.भा.स्वाभिमानी संघर्ष सेना पुरस्कार जाहीर

अ.भा.स्वाभिमानी संघर्ष सेना पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी – अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना व पि.थो.सामाजिक संस्था राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२५ साठी मा. अध्यक्ष पिराजी थोरवडे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या तसेच साहित्य क्षेत्रातील विविध प्रकारच्या साहित्यासाठी पुरस्काराचे आव्हान करण्यात आले होते. सदर पुरस्कारासाठी यादी जाहीर करण्यात आली आहे. पुरस्कार दिनांक १ जुलै २०२५ रोजी आदरणीय मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहेत. सौ.अनिता चेतन घाटगे – राजमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार, श्री सुहास महादेव चव्हाण-महात्मा ज्योतिराव फुले समाजसेवा पुरस्कार, श्रीमती कांचन देविदास क्षीरसागर- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समाजसेवा पुरस्कार, श्री सर्जेराव देशमुख व सौ अस्मिता देशमुख- महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले समाजसेवा पुरस्कार, संतोष शामराव पवार- स्वाभिमानी यशस्वी उद्योग सेवा पुरस्कार,शितलकुमार अर्धावर सर- डॉ बाबासाहेब आंबेडकर शिक्षणसेवा पुरस्कार, संतोष उर्फ संताजी नेताजी पाटील- छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमानी सेवा पुरस्कार, श्री विजय वसंतराव चव्हाण- छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमानी सेवा पुरस्कार, ग्रंथमित्र विश्वास निकम- स्वाभिमानी आदर्श ग्रंथसेवा पुरस्कार, संतोष जनार्धन डांगे- स्वाभिमानी आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार, अमर जाधव- स्वाभिमानी आरोग्य सेवक पुरस्कार, सौ विजया माने- स्वाभिमानी आदर्श पत्रकारिता पुरस्कार , विद्या उत्तम मोरे- स्वाभिमानी समाजसेवा पुरस्कार जाहीर झालेले आहेत तर साहित्य क्षेत्रात *कविता संग्रह* प्रा प्रमोद नारायणे- स्पार्टकसी मरण आले तरी, डॉ सुरेश वाकचौरे- थडग्यातला सूर्य, डॉ देविदास तारु- गंध मनाचा, विलास माळी- झांजर झाप, डॉ विनय दांदळे-निशब्द काळजाची ओल, प्रा पंढरी बनसोडे- शब्द फुले, श्री विक्रांत केसकर-समर्पण, भारती पाटील- आदिम दुःखाचे वर्तुळ, सोमनाथ पगार- वेदनेचे काटे, रेखा दीक्षित -मौनातला चाफा, डॉ प्रभाकर शेळके- वंचितांचे निळे पंख, शशांक देशमुख- व्यासंग जडतो तेव्हा, कवी आनंद हरि व कवी महेबूब जमादार- अक्षरमैत्र, श्रीनिवास दीक्षित- रिकाम्या जागा, दत्तात्रय पाटील उर्फ कवी कांचनदत्त- मोगरा फुलला, इंद्रजीत पाटील -कळपोटी आली ओठी. *कादंबरीसाठी पुरस्कार* विशाल मोहोड-किड, दिवाकर म्हात्रे- जीवनी मोगरा फुलला, *कथासंग्रहासाठी पुरस्कार* गोकुळ गायकवाड- ताटातूट, आरती लाटणे- मायेचं गाठोडं, शरद अत्रे- जगावेगळी, डॉ सुनिता चव्हाण- इच्छा मरण, न.ग.पाटील- देव गेला दिगंतरा (नाटक), शीला माने- थोर समाज सुधारक, दत्तात्रय शिवराम हिर्लेकर गुरुजी – कर्तव्यपूर्ती (आत्मचरित्र), निवडक साहित्य शोध आणि बोध- नंदकुमार शेडगे, ग्रंथ निवड व ग्रंथखरेदी सोपस्कार- प्रा आर आर मांगले व एम एस जाधव व मुक्त संवाद या दिवाळी अंकास उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष कवी लेखक सत्यवान मंडलिक यांनी परीक्षणानंतर अंतिम निवड जाहीर केली आहे. तसे पत्र पुरस्कारार्थींना देण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments