प्रतिनिधी : राज्य शासनाने रायगड जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, भा.प्र.से. यांची नियुक्ती मनरेगाच्या आयुक्तपदी केली आहे.
डॉ. भरत बास्टेवाड, भा.प्र.से. यांनी आज मनरेगा आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. उपायुक्त श्री. सुबोध मोहरील व सहाय्यक आयुक्त श्रीमती सुस्मीता शिंदे यांनी मा. आयुक्त महोदयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी आयुक्तालयातील इतर अधिकारी उपस्थित होते.




