Wednesday, August 27, 2025
घरमहाराष्ट्रशेलार कॉम्प्लेक्स व हॉटेल स्प्री उद्योगातही निश्चितच विजयी होतील- नामदार जयकुमार गोरे

शेलार कॉम्प्लेक्स व हॉटेल स्प्री उद्योगातही निश्चितच विजयी होतील- नामदार जयकुमार गोरे

पंढरपूर(अजित जगताप) : सातारा जिल्ह्यातील जावळीचे सुपुत्र यांचे पंढरपूरच्या विठुरायाच्या भूमीत पुनर्वसन झालेला आहे. या ठिकाणी आपुलकी व जिव्हाळा निर्माण करून त्यांनी उद्योग व्यवसायामध्ये नावाप्रमाणेच विजय संपादन केला आहे. हॉटेल स्प्री व शेलार कॉम्प्लेक्स सातारा- सोलापूर जिल्ह्यातील जिव्हाळ्याचे केंद्र बनेल. तसेच विजय निश्चित होतील अशा शब्दात राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, पुनर्वसन व मदत मंत्री नामदार मकरंद आबा पाटील, आमदार सुभाष देशमुख ,आमदार समाधान अवताडे, आमदार अभिजीत पाटील, सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील, आमदार सचिन कलशेट्टी व सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.श्री विठ्ठल रखुमाई च्य पदस्पर्शाने पावन झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील सह्याद्री नगर, इसबावी येथे उभारण्यात आलेल्या शेलार कॉम्प्लेक्स व हॉटेल स्प्रीचा नेत्रदीपक उद्घाघाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न झाले.
उद्योजक विजय श्रीरंग शेलार यांनी परिश्रम आणि जिद्द तसेच प्रामाणिकपणाने व्यवसाय करून महाराष्ट्रात आपले नाव मोठे केले आहे. वारकरी संप्रदायाचे अयोध्या असलेल्या पंढरपुरात आकर्षक व लोकांचे उपयोगी पडणारी वास्तू उभी केली आहे. या भूमीमध्ये जावळीच्या खोऱ्यातील मावळ्याचे निशाण फडकवली आहे. येथील भूमिपुत्रांनी सामावून घेतलेली आहे. हे चित्र निर्माण झाले.
या सोहळ्याला सातारा व सोलापूर जिल्ह्यातील अनेक प्रतिष्ठित नागरिक हितचिंतक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक साताराचे माजी जि.प. उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी केले. व सुत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले. या सोहळ्यात सातारा येथील विरेंद्र केंजळे प्रस्तुत साज ग्रुप च्या गायक वादक कलाकारांनी बहारदार गीतांनी नव्या जुन्या आठवणींचा गारवा निर्माण केला. संगीताच्या मैफिलीने व भोजनाचा आस्वाद याचा सुरेख संगम पाहण्यास मिळाला.या उद्घाघाटन सोहळ्यासाठी हनुमंतराव चवरे ,तानाजीराव शिर्के, हनुमंतराव पार्ट- जाधव, दत्ता पवार मेढेकर, दत्ता वारागडे, हनुमंतराव शेटे, तुकाराम धनवडे, तुकाराम जुनघरे, पांडुरंग धनावडे अण्णासाहेब चव्हाण, रवी परामणे ,पांडुरंग वाघ, बंडोपंत मुकादम, प्रकाश परामणे, विधाते,
माजी आमदार दत्तात्रय सावंत, खर्डीचे उपसरपंच प्रणव परिचारक, रयत आथनी सह. साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह उंडाळकर-पाटील , स्वेरी इंजिनिअरींग कॉलेजचे प्राचार्य बी.पी. रोंगे सर, सातारा जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन अनिल देसाई, संचालक राजेंद्र राजपुरे, प्रदीप विधाते, दत्तानाना ढमाळ, ज्ञानदेव रांजणे, व्यवस्थापक राजेंद्र सरकाळे, अजित जगताप, हरीष पाटणे, हिंदूराव तरडे, जावळी जिल्हा बँकेचे चेअरमन विक्रम भिलारे, व्हाईस चेअरमन चंद्रकांत दळवी, संचालक योगेश गोळे व सर्व संचालक, ऍडव्होकेट शिवाजीराव मर्ढेकर, पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शिरसट, पांडुरंग साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन वसंतनाना देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे, माजी जि.प. सदस्य सी.पी. बागल, पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे, पंढरपुर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष विशाल मलपे, माजी नगरसेवक गणेश अधटराव, बालाजी मलपे, विक्रम शिरसट, सचिन शिंदे, मुन्ना मलपे, स्वेरी इंजिनिअरींग कॉलेजचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, माजी अध्यक्ष धनंजय सालविठ्ठल, नामदेव कागदे, अशोक भोसले, नाडगौडा सर, हनीफ शेख, अशोक भोसले, सुरेश राऊत, मराठा महासंघाचे अध्यक्ष अर्जुन चव्हाण, यांचेसह पंढरपूरचा सोलापूर, सातारा जिल्ह्यातील अनेक मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उद्योजक शेलार परिवाराच्या वतीने सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले तसेच आभार मानले. दरम्यान या कार्यक्रमानिमित्त कुडाळ व मेढा या भागातून लक्झरी बसने आलेल्या अनेक वारकरी भाविकांनी पंढरपूर येथे जाऊन श्री विठ्ठल रखुमाई चे दर्शन घेतले या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त कार्यक्रमचा आनंद व श्री विठुरायाच्या दर्शनाने अनेक जण भारावून गेले. चंद्रभागेच्या तीरावरती जाऊन अनेकांनी स्नान करून आशीर्वाद घेतले._________________________________
फोटो – उद्योजक विजय शेलार यांच्या हॉटेल स्प्री व शेलार कॉम्प्लेक्सचे उद्घाघाटन करताना मान्यवर (छाया- अजित जगताप पंढरपूर)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments