नवी मुंबई : आज राष्ट्रीय सागरी दिन साजरा करत असताना, भारतीय खलाशांच्या योगदानाला सलाम करताना, DGS (Directorate General of Shipping) मध्ये एक गंभीर घोटाळा समोर आला आहे. खोट्या प्रमाणपत्रांच्या अपलोडिंगमुळे आणि INDOS क्रमांक विनाकारण ब्लॉक करण्यात आल्यामुळे शेकडो खलाश बेरोजगार झाले आहेत.
ही तक्रार सुनील गाडेकर, मनसे (MNS) नाविक सेना यूनियनचे उपाध्यक्ष, यांनी CBI मुंबई झोन मध्ये सादर केली आहे. त्यांच्या मते, ही DGS च्या अधिकाऱ्यांमधील अंतर्गत संगनमत किंवा व्यवस्थात्मक अपयशामुळे घडलेली घटना असल्याचा आरोप गाडेकर यांनी केला आहे.
आरोप केलेल्या बाबतीत ठळक मुद्दे:
• फसव्या COC प्रमाणपत्रांची DGS च्या सुरक्षित MasterChecker प्रणालीमध्ये अपलोडिंग करणे जे काम हे केवळ अधिकृत लोकांनाच शक्य आहे
• १०० पेक्षा जास्त खलाशांना कोणतीही चौकशी न करता दंडित करणे
• DGS अधिकारी, प्रशिक्षण संस्था किंवा दलाल यांच्यावर कोणतीही कारवाई न करणे
• पीडित खलाशी व त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक व मानसिक ताण आणणे..
• DG शिपिंगची आतली चौकशी एकांगी व पक्षपाती करणे असे एक न अनेक आरोप करीत सुनील गाडेकर म्हणाले:
“ही केवळ तांत्रिक चूक नाही—ही बेजबाबदारीची अत्यंत चिंताजनक गंभीर बाब आहे. जे अधिकारी प्रणाली चालवतात, त्यांच्या संमतीशिवाय हे बेकायदेशीर प्रमाणपत्र अपलोड होऊच शकत नाहीत. निर्दोष खलाशांवर वर असे अन्याय थांबवले पाहिजे.” म्हणून गाडेकर यांनी सदर तक्रार निवेदन करून CBI कडे कायदेशीर कारवाई करण्यासाठी मागणी केली आहे.
यात त्यांनी DG शिपिंगच्या प्रणालीची फॉरेन्सिक तपासणी करण्यात यावी, दोषी अधिकार्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,निर्दोष खलाशांचे INDOS क्रमांक त्वरित पुन्हा सक्रिय करण्यात यावेत अशी ही मागणी केली आहे.ही घटना भारताच्या समुद्री कार्य प्रणाली च्या विरुद्ध असून त्या प्रतिमेस गंभीर धक्का देऊ शकते, असे मत अनेक तज्ज्ञांनी ही सदर माहिती नंतर व्यक्त केले आहे. समुद्री क्षेत्रात पारदर्शकता आणि सुधारणा ह्या काळाची गरज असल्याचे सांगत ,आज ही अश्या असंविधानिक घटना घडत असन दुर्भाग्यच आहे, खरा राष्ट्रीय सागरी दिन साजरा करण्याचा आनंद अश्या लोकांना न्याय देताना होईल असे प्रतिपादन सुनील गाडेकर यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले.